आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Launch Mygov.nic.in News In Marathi

सरकारी कामकाजात सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदींच्या हस्ते mygov.nic.in पोर्टल लॉंच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शनिवार) MyGov वेबसाईट लॉंच करण्यात आली. गंगेची स्वच्छता आणि कौशल्य विकास यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर नागरिकांची मते आणि सूचना घेण्यासाठी mygov.nic.in ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आज 60 दिवस पूर्ण झाले. यानिमित्त ही नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेली वेबसाईट लॉंच करण्यात आली आहे.
अनेक नागरिकांना देशाच्या विकासात सहभागी व्हायचे आहे, असे गेल्या 60 दिवसांच्या अनुभवातून दिसून आले आहे. त्यांचा वेळ आणि ऊर्जा यांचा देशाला लाभ व्हावा म्हणून ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की सरकार आणि लोकांमध्ये असलेली दरी दूर करण्यात ही वेबसाईट महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. जनतेच्या सरकारमधील सहभागाशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. जनतेचा लोकशाहीतील सहभाग केवळ निवडणुकांपूरता मर्यादित राहू नये म्हणून ही वेबसाईट लॉंच करण्यात आली आहे.
नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरचे (एनआयसी) डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही वेबसाईट सांभाळणार आहे.