आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या 'महागजर्नना' सभेसाठी मुंबईत दाखल झाले असून सभेसाठी महाराष्ट्रातून लाखो कार्यकर्ते सभास्थळी दाखल झाले आहेत. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर मोदींनी स्वतःच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले. या पुतळ्यासोबत त्यांनी फोटोही काढून घेतले.
नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. त्यांनी उत्तम मराठीत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराज, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
देशातील समस्यांचे कारण जनता, इतिहास, भूगोल, नैसर्गिक संपत्ती नसून कॉंग्रेसशासित सरकारे आहेत. यावर भारताला कॉंग्रेसमुक्त करण्याचा एकच उपाय आहे. याच मुंबईतूनच ऑगस्ट क्रांती मैदानातून 'छोडो भारत'चा नारा गेला होता. आता 'कॉंग्रेस छोडो भारत' हा नारा देण्याची वेळ आली आहे. सभेचा समारोप करताना मोदींनी 'व्होट फॉर इंडिया' हा आणखी एक नारा दिला.
मोदींनी सिंचनाच्या मुद्यावरुन आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रातील सिंचनातील सर्व प्रकल्प भ्रष्टाचारामुळे खड्ड्यात गेले आहेत. याचे काय कारण आहे? कशामुळे महाराष्ट्रातील जनतेला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे? शेतक-यांवर आत्महत्येची वेळ कशामुळे होत आहे, असे सवाल मोदींनी केले.
मोदींनी महाराष्ट्रातील वीज टंचाईच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रात भारनियमन आहे. गुजरातमध्ये 24 तास वीज उपलब्ध आहे. गुजरातच्या सरदार सरोवर धरणाच्या पाण्यापासून तयार होणा-या वीजेवर महाराष्ट्राचा अधिकार आहे. राज्य आणि केंद्रात कॉंग्रेसचे सरकार आहे. धरणावर गेट लावल्यास महाराष्ट्राला वीज मिळू शकते. परंतु, त्यासाठी 5 वर्षांपासून परवानगी देण्यात आलेली नाही. यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यांना जनतेने जाब विचारला पाहिजे.
राहुल गांधींवर नाव न घेता टीका... वाचा पुढील स्लाईड्समध्ये...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.