फोटो: आपच्या वेबसाइटवर असलेली मोदींचे छायाचित्र, हे छायचित्रनंतर काढून टाकण्यात आले.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाच्या (आप) संकेतस्थळावर देशाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र पाहण्यास मिळाले आहे. विशेष म्हणजे, हे छायाचित्र '
ट्विटर' आणि '
फेसबुक'वर या सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर याची चेष्टा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर हे छायाचित्र संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आले आहे.
'आप' च्या संकेतस्थळावर मोदींच्या फोटोसोबत 'दिल्ली स्पीक्स, मोदी फॉर पीएम, अरविंद फॉर सीएम' असा संदेशदेखील लिहिण्यात आला होता, 'आप'च्या या रणनीतीमागे नरेंद्र मोदींना आवाहन न देता
केजरीवालांसाठी स्पेस तयार करण्याची रणनीती जवाबदार असल्याचे बोलले जात आहे.
दिल्ली विधानसभा बरखास्त झाल्यानंतर भाजप आणि 'आप'मध्ये झेंडे, बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली असल्याचे चित्र आहे. भाजप दिल्ली निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर न करता मैदानात उतरणार आहे. तर आपच्या उमेदवारचे नाव निवडणुकीपूर्वी जाहीर करणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे.