आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Mantra To Compete With China: Raise Skill, Scale And Speed

चीनशी स्पर्धेसाठी तीन ‘एस\'; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला स्किल, स्केल, स्पीडचा मंत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनशी स्पर्धा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला तीन ‘एस’चा मंत्र दिला. स्किल, स्केल आणि स्पीड असे ते ‘एस मंत्र’ आहेत.

सात रेसकोर्स या निवासस्थानी प्रथमच झालेल्या एका कार्यक्रमात रविवारी मोदी बोलत होते. ते म्हणाले, देशातील 65 टक्के लोकसंख्या पस्तिशीच्या आतील आहे. या प्रतिभेचा योग्य वापर व्हायचा असेल तर तरुणांच्या स्किल डेव्हलपमेंटवर भर द्यावा लागेल. ध्येय ठरवताना त्याची कक्षा म्हणजे स्केल मोठा असायला हवा. शिवाय हे ध्येय वेगाने म्हणजे स्पीडने गाठले जावे. या तीन बाबींना प्राधान्य दिले पाहिजे.

कार्नेगी एन्डॉवमेंट फॉर इंटरनॅशनल पीसने काढलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी मोदी बोलत होते. गेटिंग इंडिया बॅक ऑन ट्रॅक अँन अँक्शन, अजेंडा फॉर रिफॉर्म नावाच्या या पुस्तकाचे संपादन विवेक देबरॉय, अँश्ले टेलिस आणि रीस ट्रेव्हर यांनी केले आहे. या वेळी उपस्थित असलेले अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले की, जग पुन्हा एकदा भारताकडे आशेने पाहत आहे. म्हणूनच भारतीयांनी आता या संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्नशील व्हावे.
पुढे वाचा, चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी सुषमा स्वराज यांची चर्चा