आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Meet Ex PM Of India Dr. Manmohansing

मोदी माजी पंतप्रधानांच्या भेटीला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या नव्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. डॉ. सिंग व त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांनी त्यांचे स्वागत केले. ही सदिच्छा भेट होती, असे पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
- मोदी अजून रेसकोर्स रोडवरील पंतप्रधानांसाठी असलेल्या निवासस्थानात राहावयास गेलेले नाहीत. सध्या त्यांचा मुक्काम गुजरात भवनमध्येच आहे. पंतप्रधान निवासस्थानाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यावर ते राहावयास जातील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
छायाचित्र : पंतप्रधान मोदी यांनी डॉ. मनमोहनसिंग यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.