आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Meet To Council Of Ministers, News In Marathi

अरुण जेटलींनी स्विकारला पदभार; राजनाथ गृहमंत्री तर सुषमांकडे परराष्ट्र मंत्रालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास आपल्या पदाचा स्विकारला. नंतर नव्या सरकारमधील मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांची औपचारीक घोषणा करण्यात आली. राजनाथ सिंह यांना गृहमंत्री, सुषमा स्‍वराज यांना परराष्ट्र मंत्री, अरुण जेटली यांना अर्थ व संरक्षण मंत्री, सदानंद गौडा यांना रेल्वमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. घोषणा झाल्यानंतर लगेचच संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आपापला पदभार स्विकारण्यास सुरुवात केली आहे.

अरुण जेटली यांनी सगळ्यात आधी आपला पदभार स्विकारला. देशातील महागाई कमी करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे जेटलींनी यावेळी सांगितले.

दरम्यान, सोमवारी (26 मे) मोदींसह त्यांच्या मंत्रिमंडळातील 45 सदस्यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या दिमाखदार सोहळ्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले.

मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी सार्क परिषदेतील आठ राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचा समावेश होता. तसेच उद्योजक, बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटपटू आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते

देशाचे पंधरावे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पदभार स्विकारला. मोदींच्या मोदींच्या मंत्रिमंडळातील खातेवाटप पुढील स्लाइड्‍सवर...