नवी दिल्ली- मुस्लिम समाजाने तीन तलाकच्या मुद्द्याचे राजकारण होऊ देऊ नये. त्याऐवजी यातून मार्ग काढण्याच्या दिशेने पुढाकार घ्यावयास हवा, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. जमियते ए उलेमा हिंदशी संबंधित मुस्लिम समाजाच्या २५ नेत्यांशी मंगळवारी झालेल्या चर्चेत पंतप्रधानांनी हे आवाहन केले. मनोमिलन लाेकशाहीची मोठी शक्ती असल्याचे सांगत मोदी म्हणाले, सरकारला नागरिकांमध्ये भेदभाव करण्याचा अधिकार नाही. देशातील तरुणांना जगभरात पसरणाऱ्या दहशतवादाच्या जाळ्यापासून रोखले पाहिजे.
अनेकात एकता हे देशाचे सौंदर्य
- यावेळी 25 मुस्लिम नेत्यांनी मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आपआपसातील प्रेम आणि सद्भावना ही लोकशाहीची ताकद असल्याचे यावेळी नेत्यांनी मोदींना सांगितले.
- यावर मोदी यांनी अनेकात एकता हे देशाचे सौंदर्य असल्याचे सांगितले. तसेच तरुणाईला जगातील वाढत्या कट्टरतेपासून वाचवणे गरजेचे असल्याचे मोदींनी सांगितले.
ट्रिपल तलाकविषयी काय म्हणाले मोदी?
- 'मुस्लिम नेत्यांनी ट्रिपल तलाक या मुद्दयाचे राजकारण न करता, सुधारणेसाठी पुढे आले पाहिजे', असे आवाहन या बैठकीत मोदींनी केले.
- यावेळी नेत्यांनी काश्मीरमधील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच तुम्हीच या प्रश्नावर तोडगा काढू शकता, असे ते मोदींना म्हणाले.
- देशाच्या विकासामध्ये मुस्लिमाचांही बरोबरीचा हिस्सा आहे. दहशतवादाविरोधात सर्वांनी एक येण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले.
- या बैठकीविषयी आपण समाधानी असल्याचे मुस्लिम नेत्यांनी बैठकीनंतर सांगितले. तसेच मोदींच्या दृष्टीकोनाबद्दल मोदींची स्तूतीही केली.
देशाविरोधात कोणतेही षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही
- देशाविरोधात कोणतेही षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाहीत, असे आश्वासन मुस्लिम नेत्यांनी यावेळी मोदींना दिले.
- या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हलही उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, जगाचे लक्ष सध्या भारताकडे आहे. अशावेळी देशाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे.'
- बैठक संपल्यानंतर बैठकीबद्दल आनंद व्यक्त करताना नेत्यांनी मोदी यांच्या विकाययोजनांची स्तूती केली.