आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी म्हणाले : टोपी घालून, फोटो काढून धूळफेक करण्याची इच्छा नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोप : राहुल म्हणतात, मोदी टक्कल पडलेल्यांनाही कंगवे विकू शकतात.
उत्तर : मी कंगवे नाही, चहा विकला आहे. काँग्रेसच्या मनात भीती आहे की मोदी कंगवेही विकू शकतात. काँग्रेसची घोषणा खरे तर ‘हर हाथ लूट, हर होठ झूठ’ अशीच असायला हवी होती.
आरोप : दंगलीसंदर्भात मुस्लिमांची तुलना ‘पपींशी’ केली.
उत्तर : मी कुणालाच पपी म्हटलेले नाही. मी भावना व्यक्त करत होतो. एखादी मुंगी मेली तरी वेदना होतात, असेही म्हटले जाते. मग कुणी म्हणेल की, मी माणसाला चक्क मुंगी म्हणालो. मुळात हीच समस्या आहे.
आरोप : सपा नेते आझम खान यांनी ‘कुत्ते का बडा भाई’ संबोधले.
उत्तर : श्वानाच्या प्रामाणिकपणाचे लोक दाखले देतात. माझ्या प्रामाणिकपणामुळे देशाचे भले होणार असेल तर मला आनंदच आहे. देशात फूट पाडल्याचा आरोपही माझ्यावर होतो. मुळात जात व लांगूलचालन करणार्‍यांमुळेच देशाचे नुकसान झाले आहे.
आरोप : काही वर्षांपूर्वी मौलवींनी दिलेली टोपी घालण्यास नकार दिला होता.
उत्तर : टोपी घालूनच एकात्मता सिद्ध होणार असेल तर मी कधीही महात्मा गांधी, सरदार पटेल किंवा पंडित नेहरूंना अशी टोपी घातलेली पाहिले नाही. मुळात लांगूलचालनाचे राजकारण भारतात सुरू आहे. सर्व धर्म आणि परंपरांचा आदर करणे हे माझे कर्तव्य आहे. मी माझ्या धर्माचे पालन करतो आणि इतरांचा सन्मान. म्हणूनच टोपी घालून लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे पातक मी करू शकत नाही. कुणी कुणाची टोपी उडवून लावत असेल तर मी त्यांना कठोर शासन करतो. मला वाटते की, जे लोक टोपी घालतात, त्यांच्या हाती पवित्र कुराण असेल तर कॉम्प्युटरही असायला हवे.
आरोप : विकासाचे दावे खोटे आहेत.
उत्तर : असे आरोप करणार्‍यांना माहिती पाहिजे की, असे दावे राजस्थान, उत्तर प्रदेश आणि प. बंगालमध्ये खपवून घेतले जातात. गुजरातमध्ये ते शक्य नाही. हे दावे खोटे असते तर गुजराती जनतेने आम्हाला वारंवार निवडून दिले नसते.