आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१५ केंद्रीय मंत्र्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रातील१५ मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या १०० दिवसांच्या कामकाजाचे विवरण न दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज झाल्याचे वृत्त आहे. पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांना १०० दिवसांच्या कामकाजाची माहिती देण्यास सांगितले होते. मात्र डॉ. हर्षवर्धन, धमेंद्र प्रधान, संतोष गंगवार, हरसिमरत कौर बादल, मनेका गांधी, राधामोहनसिंह, नजमा हेपतुल्ला, राव इंद्रजितसिंह, श्रीपाद नाईक, उमा भारती, व्ही.के.सिंह, अनंत गीते अनंतकुमार आदी मंत्र्यांनी त्याची माहिती दिली नाही. त्यांच्याकडून मोदींनी स्पष्टीकरण मागवल्याचे वृत्त आहे.