आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच संस्थेतून उचलले मोदींनी वरिष्ठ अधिकारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वरिष्ठ आयएएस अधिकारी नृपेंद्र मिश्र आणि अजित डोवाल मोदी सरकारचे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. यानंतर प्रकाश सिंह आणि अनिल बैजल यांच्यासाठी योग्य पदाची शोधाशोध सुरू आहे. आपल्या व्यावसायिक जीवनात महत्त्वाची जबाबदारी बजावलेल्या या अधिकार्‍यांमध्ये एक समान गोष्ट आहे ती म्हणजे गेल्या काही वर्षांपासून ते विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशनशी जोडले आहेत. नव्या सरकारमध्ये त्यांना थेट तेथून आणले जात आहे. अखेर नवे सरकार, या अधिकारी व संस्थेमध्ये नेमके नाते काय आहे, हे जाणण्यासाठी ‘भास्कर’ मुळापर्यंत गेले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर आधारित थिंक टँक विवेकानंद फाउंडेशनचे सामरिक व धोरणात्मक प्रकरणांवरील इनपूट नव्या सरकारसाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. फाउंडेशनने भारताचा इतिहास नव्याने लिहिण्यास सुरुवात केली आहे. डोवाल यांच्या जागी एन.सी. विज यांना फाउंडेशनच्या संचालकपदाची जबाबदारी सोपविली जात आहे.

मोदी यांचे विवेकानंद फाउंडेशनवर सहज लक्ष गेले नाही. यूपीए सरकारच्या नाकी नऊ आणणार्‍या कारवायांचे फाउंडेशन केंद्र राहिले आहे. या केंद्रातच पडद्याआड योजना तयार झाल्या. सत्ताधारी काँग्रेस व यूपीए इशरत जहाँ चकमक प्रकरणात नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा डोवाल यांनी मोदी यांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी इशरत जहाँला लष्कर-ए-तोयबाची सदस्य ठरवून राजकीय हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फाउंडेशन संघाशी थेट संबंध असल्याचा इन्कार करत आहे, मात्र येथील कार्यक्रमात संघ स्वयंसेवकांचा वावर लक्षात येण्यासारखा आहे. फाउंडेशन विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचा भाग आहे. आरएसएसचे एकनाथ रानडे यांनी याची स्थापना केली होती. संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकार्‍याने सांगितले की, ज्या अधिकार्‍यांना सरकारमध्ये नियुक्त केले आहे, त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. बाबा रामदेव आणि अण्णा हजारे यांच्या आंदोलनादरम्यान पडद्याआडून धोरण व वैचारिक इनपुट देण्याचे काम याच संस्थेने केले.
पीएमओचे मुख्य सचिव आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
नृपेंद्र मिश्र - कल्याणसिंह मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे मुख्य सचिव होते. तेव्हा ते भाजप नेतृत्वाजवळ आले. ट्रायचे चेअरमन असताना अरुण जेटली आणि अमित शहांसारख्या नेत्यांचाही संपर्क वाढला.

अजित डोवाल - आयबीचे माजी संचालक म्हणून त्यांचा देशाच्या सुरक्षेशी संबंधित अनेक मोहिमांशी संबंध आला. डोवाल यांचे नक्षलविरोधी आणि दहशतवादविरोधी मोहिमेचे धोरण संघ विचारसरणीच्या जवळचे मानण्यात आले.