आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद केजरीवाल अमेरिकेचे एजंट; मोदींचे प्रथमच प्रत्युत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल अमेरिकेचे एजंट आहेत. गॅस दरवाढीचा मुद्दा ते लावून धरतात, परंतु ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याविषयी काहीच बोलत नाहीत, अशा शब्दांत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रथमच केजरीवाल यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

अमेरिकेसह परदेश बड्या कंपन्यांचे खिसे भरले जावेत म्हणून केजरीवाल नेहमी गॅस आयात करण्याच्या बाता करत असल्याचे मोदींनी म्हटले आहे. गॅस दरवाढीला सर्वप्रथम भाजपने विरोध केल्याचे स्पष्ट करून मोदींनी आपल्या 16 पानी उत्तरात एक एक मुद्दय़ावर केजरींचे आरोप खोडून काढले आहेत.

लोकसभा प्रश्नोत्तरांचा हवाला देऊन मोदींनी म्हटले आहे की, महाराष्ट्र व आंध्रात शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या आहेत. 3 वर्षांत गुजरातेत एकाही शेतकर्‍याने आत्महत्या केलेली नाही.