आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवालांवर टीकास्त्र अन् काश्मिरींचे मुद्दे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिरानगर/बुलंदशहर/नवी दिल्ली - नरेंद्र मोदींनी बुधवारी जम्मूतील हिरानगर, उत्तर प्रदेशातील बुलंदशहर आणि नवी दिल्लीतील सीलमपूरमध्ये निवडणूक प्रचार सभेत भाषण केले. हिरानगरमधील सभेत त्यांनी अरविंद केजरीवालांवर आक्रमकपणे टीका केली, तसेच काँग्रेसवरही निशाणा साधला. बुलंदशहरमध्ये ते म्हणाले की, ‘16 मे नंतर काय हाल होणार, हे विरोधकांना माहीत आहे.’

केजरीवाल प्रथमच टार्गेट : मोदींनी केजरीवालांचे नाव न घेता त्यांना एके-49 म्हटले. ते पाकिस्तानचा एजंट असल्याचाही आरोप केला. मोदी म्हणाले, ‘लोकपालच्या नावावर जे डावे-उजवे करतात, त्यांच्या हे कसे लक्षात येत नाही की, जम्मू- काश्मीरमध्ये हा कायदा का लागू झाला नाही? ’

वाजपेयींचा उल्लेख : मोदी म्हणाले की, अटलजींनी काश्मीरमधील तरुणांमध्ये विश्वास निर्माण केला. त्यांना आणखी पाच वर्षे मिळाली असती तर जम्मू-काश्मीरचा चेहराच बदलला असता.

जुनेच मुद्दे उगाळले : ‘काँग्रेसला 60 वर्षे दिली, मला 60 महिने द्या. राजकुमार (राहुल) म्हणतात, काँग्रेस एक विचार आहे. मात्र, एक चहावाला कुठून आला, याच विचारात काँग्रेस आहे,’ यासारखे मुद्दे मोदींनी उगाळले.

या मुद्यांवर मौन
पीडीपी, हुर्रियत आणि कलम 370 विषयी मोदींनी भाष्य केले नाही.

पहिला टप्पा
वैष्णोदेवी मंदिर २ घोड्यावर बसून सर्वप्रथम मोदी वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी गेले. तेथे कोणत्याही प्रश्नांची उत्तरे दिली नाही. आपल्यासाठी घोषणाबाजी न करण्याची विनंती त्यांनी केली होती. मात्र मंदिराबाहेर उभ्या असलेल्या समर्थकांनी ‘हर हर मोदी’च्या घोषणा दिल्या.

दुसरा टप्पा हिरानगर
मोदी यांनी 185 निवडणूक सभांच्या भारत विजय रॅलीला जम्मू- काश्मीरमधील हिरानगरमधून सुरुवात केली. व्यासपीठावर येताच ते म्हणाले, ‘भाजपच्या सभेत किती लोक जमा होतात, हा मुद्दा स्वत: उमर अब्दुल्ला यांनी जम्मू रॅलीच्या वेळी ट्विटरवरून सांगितले आहे.’ मोदी म्हणाले, ‘इथे जेवढे प्रेम मिळेल, तेवढेच विकास करून व्याजासहित परत करेन.’ नॅशनल कॉन्फरन्ससह काँग्रेसवर निशाणा साधत मोदी म्हणाले,‘वंशवाद- घराणेशाहीमुळे देश डबघाईला येत आहे.’ त्यानंतर त्यांनी तरुण आणि शेतकर्‍यांचा मुद्दा उचलला. म्हणाले- काँग्रेसने शास्त्रींचा ‘जय जवान जय किसान’चा नारा बदलला असून आता काँग्रेसचा नारा ‘मर जवान, मर किसान’ असा आहे. पाकिस्तानला तीन ‘एके’ च्या स्वरूपात 3 संरक्षक मिळाले आहेत. दहशतवादामुळे काश्मिरींवर हल्ला होत आहे.

बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात मोदी म्हणाले, देशाचे विभाजन करणार्‍यांना स्वत:चे भविष्य कळले आहे. देशाचे नुकसान करणार्‍यांना 16 मे नंतर काय होणार आहे, याची कल्पना आली आहे. मोदींना कसे रोखावे, यासाठी लोक एकत्र झाले आहेत. गुजरातमधील शेतकर्‍यांना उत्पन्नापेक्षा जास्त भाव मिळतो. त्यामुळे ते खुश आहेत. अखिलेश सरकार तरुणांच्या गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे.

नवी दिल्ली : सीलमपूरमध्ये मोदींची सभा झाली. तेथेही हर हर मोदीच्या घोषणा दिल्या गेल्या.