आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Businessmen, Delhi

जवानांपेक्षा व्यापारी मोठी जोखिम पत्करतात, नरेंद्र मोदींचा ई-कॉमर्सवर भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जागतिक आव्हानांची भीती न बाळगता व्यापारासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करायला हवा, असे मत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. जागतिकीकरणाच्या सद्यस्थितीत व्यापारी जवानांपेक्षा मोठी जोखिम पत्करतात, असेही वादग्रस्त वक्तव्यही मोदींनी यावेळी केले.
ऑल इंडिया ट्रेडर्स महासंघाच्या परिषदेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, की व्यापारवृद्धी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करायला हवा. ग्रामीण भागातील नागरिकही आता ब्रॅंडेड वस्तूंची मागणी करताना दिसत आहेत. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांनी आपली मानसिकता बदलायला हवी. व्यापार मोठा करण्याच्या दिशेने पावले उचलायला हवी. वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी ई-कॉमर्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भर द्यायला हवा. ऑनलाईन विपणन व्यवस्था सुधारली तर व्यापारात वाढ होईल. ऑनलाईन विश्वात प्रवेश करून आभासी मॉल्स उभारण्याचा विचार करायला हवा.
मोदी पुढे म्हणाले, की आमच्या मुलांनी तंत्रज्ञानाला जगाच्या कानाकोपऱ्यात नेले आहे. व्यवसायवृद्धीसाठी आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आदर केलाच पाहिजे. आपण जागतिकीकरणाची आव्हाने स्वीकारली पाहिजे. आव्हानांचे रुपांतर संधीत करायला हवे. आव्हानांचा विचार केला तर जवानांपेक्षा मोठी आव्हाने व्यापारी पेलत असतात.