आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Divya Marathi, Make In India

मोदींच्या ‘मेक इन इंडिया’चा २५ सप्टेंबरपासून प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंिडया’ अिभयानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ सप्टेंबरला करणार आहेत. उत्पादनक्षेत्रात भारत जागतिक पातळीवर अव्वल स्थानी राहावा हा या मोहिमेचा उद्देश आहे.

एका अिधका-याने दिलेल्या माहितीनुसार विज्ञान भवनात या दिवशी आयोिजत कार्यक्रमात देश-िवदेशातील अनेक कंपन्यांचे अिधकारी सहभागी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणामध्ये हा उल्लेख करून मेक इन इंिडयाने जगावर छाप सोडावी, असे आवाहन केले हेाते. यासाठी जगभरातील उद्याेगपतींनी भारतात उद्योग उभारण्यासाठी पुढे यावे, असे त्यांनी म्हटले होते. हे अिभयान यशस्वी होण्याच्या दृष्टीने मुंबई, चेन्नई, बंगळुरूसह विविध राज्यांच्या राजधान्यांमध्ये २५ सप्टेंबरला हे अिभयान सुरू करण्यात येईल. यानंतर ज्या देशांच्या प्रमाणवेळा भारतासारख्या आहेत त्या देशांत उद्योग सुरू करण्यात येतील.