नवी दिल्ली- 'कोणत्याही जिवंत व्यक्तीचा जीवन संघर्ष पाठ्यक्रमात नसावा' असे मत देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी 'ट्विटर'च्या माध्यमातून व्यक्त केले आहे. तसेच आपल्या जीवनावर आधारीत धडा शालेय पाठ्यक्रमात समाविष्ठ करण्यात येऊ नये, असेही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
देशातील काही राज्यात माझ्या जीवनावर आधारीत धड्याचा शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करणार असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून अनेक वृत्तपत्रात झळकत आहे. परंतु कोणत्याही जिवंत व्यक्तीच्या जीवन संघर्षावर आधारीत धडा शालेय पाठ्यक्रमात नसावा, असे मत मोदींनी व्यक्त केले.
मोदीं म्हणाले, भारताच्या इतिहासात अनेक महापुरूष होऊन गेले आहेत. विद्यार्थ्यांनी या महापुरूषांच्या जीवनकार्याचा अभ्यास करावा. यासाठी या महापुरूषांच्या जीवनावर आधारीत धडे शालेय पाठ्यक्रमात असावे.
दरम्यान, दरम्यान, मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान सरकारने विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संघर्षपूर्ण जीवनकार्याचा शालेय पाठ्यक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यावर मोदींनी 'ट्विटर'वर आपले स्पष्टीकरण दिले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणाले मध्य प्रदेशचे शालेय शिक्षणमंत्री..