आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Prime Minister, Divya Marathi

गुजरात मॉडेलच्या धर्तीवर गरजूंना मदत, पंतप्रधान निधीच्या वाटपात मोदीस्टाइल बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान निधीतून मदतीचे वाटप केले जात असताना लाभार्थींची निवड गुजरात मॉडेलच्या धर्तीवर केली जावी, असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिले. या निधीतून केल्या मदतीसंबंधीच्या कार्यपद्धतीचा आढावा घेताना मोदी यांनी अनेक बदल सुचवले असल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान निधीमध्ये समाविष्ट केली जाणारी रक्कम सर्वस्वी लोकसहभागातून जमा झालेली असते. या निधीसाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नसते. हा निधी विविध बँकांमधून मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवली जाते.

मोदींचे निर्देश असे...
० लाभार्थींची निवड करताना सर्वंकष विचार व्हावा.
० लहान मुले, गरीब आणि सरकारी रुग्णालयांतील रुग्णांसंबंधीच्या प्रकरणांना प्राधान्य दिले जावे.
० दुर्धर आजारांवर उपचारांसाठी मदतीला प्राधान्य दिले जावे.

लाभार्थींना पंतप्रधानांचे पत्र मिळणार
पंतप्रधान निधीतून ज्या लाभार्थीला मदत दिली जात आहे त्याला पंतप्रधानांचे पत्र पाठवले जाईल. ज्या लाभार्थीची मदतीसाठी निवड झाली आहे अशांना एसएमएसद्वारे कळवले जाईल.

1948 मध्ये स्थापना
* पंतप्रधान राष्‍ट्रीय मदत निधीची स्थापना 1948 मध्ये करण्यात आली.
*सध्या महापूर, वादळ, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये सर्वस्व गमावलेल्यांना तसेच मोठ्या अपघातात किंवा दंगलींमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान निधीतून मदत केली जाते.
*वैद्यकीय उपचारांसाठी या निधीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. विशेषत: हृदय शस्त्रक्रिया, किडणीप्रत्यारोपण, कर्करोग यांसारख्या दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी निधीतून मदत केली जाते.