आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, Prime Minister, Divya Marathi

‘चलता है’ चालणार नाही, संरक्षण संशोधन संस्थेच्या कार्यक्रमात मोदींचा शास्त्रज्ञांना इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी संरक्षण संशोधन विकास संस्थेच्या (डीआरडीओ)शास्त्रज्ञांना आता चलता है अशी प्रवृत्ती चालणार नसल्याचे सांगितले. त्यांनी जगाच्या पुढे राहण्याचा सल्लाही दिला.

मोदी डीआरडीओच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. मोदी म्हणाले, अनेक प्रोजेक्ट्स उशिरा पूर्ण होत आहेत. संरक्षण क्षेत्रात वेगात बदल होत आहेत. आम्ही मागे आहोत. आपण कल्पना करतो तोपर्यंत बाजारात नवीन उत्पादन आलेले असते. आपल्याकडे प्रतिभेची कमतरता आहे असा भाग नाही. मात्र, माझ्या मते आपला दृष्टिकोन चलता है, असा आहे. ते शास्त्रज्ञांना म्हणाले, आपण परििस्थती बदलू इिच्छत आहात काय, जगासाठी अजेंडा नििश्चत करू इिच्छत आहात काय. आपण मागे राहून नेतृत्व करू शकत नाहीत. त्याऐवजी मार्ग दाखवून सिद्ध होऊ शकतो. १९९२ मधील प्रोजेक्टला २०१४ मध्येही आणखी वेळ लागेल असे सांगितले जात असेल तर तसे होऊ नये. जग २०२० मध्ये काही उत्पादन घेऊन येत असेल तर आपण ते दोन वर्षे आधी २०१८ मध्ये आणायला हवे.

डीआरडीओच्या कार्यक्रमात ज्येष्ठ शास्त्रज्ञ दीपंकर बॅनर्जी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना पंतप्रधान मोदी.

जगाच्या नेतृत्वासाठी अजेंडा नििश्चत करा
* जगाच्या पुढेदृष्टिकोन ठेवण्याचा डीआरडीओच्या शास्त्रज्ञांना सल्ला
* सन२०२०मध्ये जगात येणाऱ्या उत्पादनाची २०१८ मध्ये नििर्मती करा
उशिराचे प्रोजेक्ट्स :
डीआरडीच्याअनेक प्रोजेक्ट्सना उशीर झाला. यामध्ये लढाऊ िवमान तेजस, नाग क्षेपणास्त्र, जमिनीवरून हवेत मारा करणारे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र, एअरबोर्न अर्ली वॉिर्नंग अँड कंट्रोल िसस्टिम प्रोजेक्ट्स प्रमुख आहेत.
उत्पादनाचे केंद्र बनावे : जेटली
संरक्षणमंत्रीजेटली या वेळी म्हणाले, संस्थेला पुढील टप्प्यात नेणे आवश्यक आहे. डीआरडीओ संरक्षण उत्पादनाचे केंद्र बनावे. आतापर्यंत डीआरडीओ काही शोध उत्पादनांवर समाधानी होता. आपणास िवदेशावर अवलंबून राहावे लागत होते. आता हे समीकरण बदलत आहे. मात्र, त्याचा वेग वाढणे आवश्यक आहे.
तरुणांना नेतृत्वाची संधी द्या
मोदीयांनी तरुणांना संधी देण्यावर भर िदला. ते डीआरडीओला म्हणाले, तुमच्या ५२ पैकी पाच प्रयोगशाळांत ३५ पेक्षा कमी वयाच्या तरुणांची िनयुक्ती करा. िनर्णय घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवा. तरुणांमध्ये क्षमता आहे. सायबर क्षेत्रात ते चांगले काम करत आहेत. आम्ही जोखीम उचलली आहे. ही त्यातीलच आणखी एक. लष्करात काम करणाऱ्या लोकांच्या कल्पनांवर िवचार करून जगातील नामांिकत िवद्यापीठांशी संपर्क साधण्यास त्यांनी सांगितले. तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षणाशी संबंिधत रोबो स्पर्धा घेण्याचाही सल्ला िदला.