Home »National »Delhi» Narendra Modi Portugal Netherlands US Visit

US दौऱ्याच्या वेळी मोदी जाणार पोर्तुगाल-नेदरलॅंडला, 26 जून रोजी घेणार ट्रम्प यांची भेट

दिव्य मराठी वेब टीम | Jun 24, 2017, 14:50 PM IST

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 दिवसाच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेप्रमाणेच ते पोर्तुगाल-नेदरलॅंडला भेट देणार आहेत. (संग्रहित फोटो)
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्याच्या वेळीच पोर्तुगाल आणि नेदरलॅंडला जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मोदी हे भेट घेणार आहेत.

सर्वप्रथम पोर्तुगाल येथे जाणार मोदी

- मोदी यांचा परदेश दौरा हा 24 जून रोजी सुरु होणार आहे. याच दिवशी ते पोर्तुगाल येथे पोहचतील. तेथील सर्व महत्वाच्या नेत्यांची भेट ते या दौऱ्यात घेणार आहेत.
- यानंतर ते 25 आणि 26 जून रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर जातील. 26 जून रोजी ते डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. ट्रम्प हे राष्ट्रपती बनल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट असेल. या दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्वाच्या मुद्दावर चर्चा होईल. मोदी यांचा हा तीन वर्षातील चौथा अमेरिका दौरा आहे.

ट्रम्प यांच्यासोबत पाच मुद्दांवर होणार चर्चा

1. दहशतवादविरोधातील लढाई
2. आर्थिक विकास आणि सुधारणांना चालना देणे
3. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात डिफेन्स पार्टनरशिप
4. H1B व्हिसा
5. पॅरिस क्लायमेट डील

Next Article

Recommended