आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Rally In Silampur Shastri Park New Delhi

मोदींच्‍या रॅलीमध्‍ये अवतरले रावण ! बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीतील सीलमपुरमध्‍ये झालेल्‍या रॅलीमध्‍ये नरेंद्र मोदींनी आक्रमक निवडणूक प्रचार सुरू केला. मोदी समर्थकांनी सभेसाठी अचाट गर्दी केली होती. वेगवेगळे मुखवटे परिधान केल्‍याने वातावरण मोदीमय झाले होते. मोदी 295 मतदारसंघांत जाऊन 185 सभांना संबोधित करतील. गुजरातमधून निघून केंद्राच्या सत्तेपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. मोदींनी सत्तेसाठी 272 जागा जिंकण्याचे मिशन बनवले आहे. मोदींनी आपल्‍या प्रचारसभेत केजरीवाल, राहूल गांधी यांच्‍यावर कडाडून टीका केली आहे.

मोदींच्‍या रॅलीवर एक नजर
सीलमपुर येथे झालेल्‍या मोदींच्‍या रॅलीमध्‍ये मोदी समर्थक मोठ्या प्रमाणावर मुखवटे परिधान करून आले होते. त्‍यामध्‍ये रावण, मोदी तसेच मोदी टोपी अशा वस्‍तुंचा समावेश होता. मोदी गजराने वातावरण ढवळून निघाले होते.

मोदींसाठी बुलेटप्रूफ डायस
सुरक्षेच्‍या कारणावरून मोदी यांच्‍यासाठी खास बुलेटप्रूफ डायस तयार करण्‍यात आला होता. परंतू मोदी यांनी या डायसचा वापर न करता साध्‍या स्‍टेजवरूनच भाषण दिले.

मोदींनी 'आप' ला लक्ष्‍य करताना म्‍हटले, की आम आदमी पक्ष हा दुसरा कॉंग्रेस आहे. कॉंग्रेसच्‍या समर्थनावर सत्‍ता स्‍थापन करुन पुन्‍हा सत्‍ता सोडणे याला काय म्हणावे? असा प्रश्‍नही मोदी यांनी उपस्थित केला. तसेच कॉंग्रेसच्‍या जाहिरणाम्‍याचीही खिल्‍ली उडविली. कॉंग्रेसच्‍या जाहीरनाम्‍यात जून्‍याचा बाबी असल्‍याचा टोलाही त्‍यांनी लगावला.

पुढील स्‍लाइडवर पाहा, मोदी समर्थकांनी केलेली विविध त-हेची वेशभूषा...