आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल यांच्या ‘कलावती’ला मोदींचे ‘जसुबेन’ने उत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या वेळी औद्योगिक संघटना फिक्कीच्या व्यासपीठावरून त्यांनी महिला बळकटीकरणाचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांना लक्ष्य केले.

आपल्या भाषणात मोदी यांनी जसुबेन यांच्या पिझ्झाच्या यशाचे तोंडभरून कौतुक केले. त्याचवेळी जसुबेनची परिस्थिती कलावतीसारखीच तर नाही ना, जाणून घेण्यासाठी मीडिया हालचाली करेल. ही गोष्ट लक्षात घेऊन मोदी यांनी जसुबेनचे पाच वर्षांपूर्वीच पुण्यात निधन झाल्याचा आवर्जून उल्लेख केला. आम्ही तर अजूनही काँग्रेसने केलेले खड्डेच बुजवण्याचे काम करत आहोत, असे मोदी म्हणाले. विकासावर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ते बोलत होते. त्याअगोदर स्थळ आणि वेळ बदलल्याबद्दल मोदी यांनी उपस्थित महिलांची क्षमा मागितली.

पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणुन घ्‍या काय म्‍हणाले मोदी आणि काय उत्तर दिले मोदींनी...