आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra modi suit was inspired by hosni mubarak

मोदींची नवी फॅशन: घातला इजिप्तचे हुकुमशहा होस्नी मुबारक यांच्यासारखा सूट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घातलेला सूट प्रकाशझोतात आला आहे. रविवारी हैदराबाद हाऊसमध्ये ओबामासोबत झालेल्या बातचितदरम्यान मोदींनी जोधपुरी सूट घातला होता. या सूटमध्ये सरळ रेषा होत्या. या रेषा नसून त्यावर नरेंद्र दामोदारदास मोदी असे लिहल्याचे दिसून आले. मोदी यांनी घातलेला सूट याआधी इजिप्तचे माजी हुकुमशहा होस्नी मुबारक घालायचे. याबाबत सांगितले जात आहे की, अहमदाबाद स्थित जेड ब्ल्यू यांनी मोदी कुर्ता ब्रॅंडअंतर्गत बंद गळ्याचा हा जोधपुरी सूट डिझाईन केला आहे. जेड ब्ल्यू ही कंपनी मोदींचे कपडे शिवते. सोशल मिडियावर मोदींच्या या सूटची खूप चर्चा होत आहे. तसेच या सूटवरील मोदींचे छायाचित्रही मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. तर, काही यूजर्स असा सूट घातल्याबाबत टीकाही करीत आहे. एका यूजरने मोदींनी आत्ममग्नी असे संबोधले आहे.
होस्नी मुबारक यांनी 2009 मध्ये घातला होता असा सूट
इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांनी ऑक्टोबर 2009 मध्ये एका पत्रकार परिषदेत असा 'पर्सनलाईज्ड पिनस्ट्रिप सूट' घातला होता. अशा प्रकारचा सूट बनविणारी कंपनी हॉलंड अँड शेरी यांच्या म्हणण्यानुसार, असा कपडा बनविण्यास तीन महिन्याचा वेळ लागतो आणि या टू-पीस कपड्याची किंमत सुमारे 10,000 पौंड (सुमारे 9 लाख रुपये) आहे.
पुढेे पाहा, मोदींनी दोन दिवसात घातलेले निरनिराळे सूट्स...