आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांच्या टॉप 10 हीट लिस्टवर नरेंद्र मोदी; यासीन भटकळचा खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/अहमदाबाद- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दहशतवादी संघटनांकडून धोका असल्याचे समोर आले आहे. दहशतवाद्यांच्या टॉप 10 यादीत मोदींचे नाव अव्वल स्थानी असून त्यांना टार्गेट करण्‍यात आले आहे. याशिवाय भाजपचे ज्येष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी यांचे नाव अकराव्या क्रमांकावर असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीन (आयएम)चा म्होरक्या यासीन भटकळ याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीत ही माहिती दिली.

यासीन भटकळ याला भारत-नेपाळ सीमेवर अटक करण्यात आली होती. यासीन सध्या हैदराबाद पोलिसांच्या ताब्यात आहे.

भटकळ यांच्या विरोधात अहमदाबाद- सुरतमध्ये एकूण 35 गुन्हे दाखल आहेत. यातील बहुतेक गुन्हे हे अहमदाबाद आणि सुरत येथे साखळी बॉम्बस्फोटाशी संबंधित आहेत. याबाबत गुजरात पोलिसही भटकळच्या चौकशीची मागणी केली आहे. यामुळे त्यांची पोलिस कोठडीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या काही दिवसांत यासीन भटकळला गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले जाऊ शकते.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'गूगल सर्चमध्ये राहुल गांधींच्या तुलनेत मोदी आणि भाजपचे पारडे जड!'