आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi To Address 1500 BJP Members In Bihar Today Via Teleconference

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांना जनता धडा शिकवणार : मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर थेट हल्ला चढवला. टेलिकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बिहार भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले, जदयूने भाजपशी 17 वर्षांची युती मोडून बिहारच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. याबद्दल त्यांना राज्यातील जनता कधीही क्षमा करणार नाही, त्यांना धडा शिकवण्यात येईल.

गांधीनगरमधून संबोधित करताना मोदी म्हणाले की, बिहारमध्ये 1974 सारखीच काँग्रेसविरोधी हवा आहे. राज्यातील जनतेने एनडीएला कौल दिला होता. ज्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे, त्यांना जनताच धडा शिकवेल.