आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi To Be Projected In Different Ways During Loksabha Election Campaign

झारखंडमध्ये नरेंद्र मोदी दिसणार चहा विकणारे, महाराष्ट्रात गरिबांचे कैवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उच्चरवात 'नमो'चा जप करण्याची पूर्ण तयारी केली आहे. प्रचार समितीचे प्रमुख असलेले नरेंद्र मोदी यांना प्रोजेक्ट करण्याची रणनीती तयार करण्यात आली आहे. याअंतर्गत प्रत्येक राज्यांत त्यांची वेगवेगळी रूपे सादर केली जाणार आहेत. कुठे गरिबांचे कैवारी, कुठे युवा आयकॉन, अल्पसंख्याक समाजात विकास पुरुष, तर झारखंडमध्ये त्यांच्या भूतकाळाचा संदर्भ देत चहा विकणारे मोदी अशी प्रतिमा सादर केली जाणार आहे.

मतदारांवर मोदींचा प्रभाव पडावा यासाठी भाजपच्या प्रचार मीडिया मॅनेजमेंटने पूर्ण तयारी केली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आदी राज्यांत गरिबांचे कैवारी असे वर्णन करून मोदींना गरीब, मागास जातींशी जोडण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. चहाच्या टपर्‍या, दुकाने व बाजारपेठेत त्यांना आयकॉनसारखे सादर केले जाईल. तशी चर्चाही घडवून आणली जाईल. मोदी हे मागास प्रवर्गातील आहेत, याची जाणीव त्या घटकांना करून दिली जाईल. सुरुवातींच्या दिवसांत मोदी चहा विकत होते. त्यामुळे झारखंडमध्ये चहा विक्रेते मोदी अशी छबी निर्माण केली जाईल. या काळात भाजपचा पूर्ण भर हा मीडिया मॅनेजमेंट व मोदींची प्रतिमा उजळण्यावर असेल. त्यासाठीच त्यांना वेगवेगळ्या रूपात सादर केले जाणार असून जातीय समीकरणे, पार्श्वभूमी, आकांक्षा लक्षात घेतल्या जातील.

कसे होईल मोदींचे ब्रँडिंग? वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...