आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या सभेला 36 देशांचे उच्चायुक्त? पाच लाख लोक येणार: भाजपचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी रविवारी दिल्लीत सभा घेत आहेत. या ‘विकास सभेला’ यशस्वी करण्यासाठी भाजप जीवतोड प्रयत्न करत आहे. या सभेत पाच लाखांचा जनसागर उसळणार असल्याचा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.

दिल्लीच्या रोहिणी भागातील जपानी पार्कमध्ये होणार्‍या या सभेसाठी भाजपने ‘बदलेंगे दिल्ली-बदलेंगे भारत’ ही घोषणा दिली आहे. सभेत सहभागी होण्यासाठी पक्षाने 45 देशांच्या उच्चायुक्तांनाही निमंत्रण दिले आहे. यापैकी 36 देशांनी ते स्वीकारले असल्याची माहिती भाजप नेते विजय जाैली यांनी दिली. मात्र अमेरिका व इंग्लंड या देशांनी सभेला आपले प्रतिनिधी पाठवण्यास नकार दिला आहे. याबाबतच्या प्रश्नावर जाैली म्हणाले, अमेरिका व इंग्लंडचे उच्चायुक्त सध्या दिल्लीत नाहीत. पाकिस्तानच्या वकिलातीस मोदी यांच्या सभेचे निमंत्रणच देण्यात आलेले नाही.

मेट्रो रेल्वेने फेर्‍या वाढवल्या
भाजपच्या मागणीवर दिल्ली मेट्रो रेल्वेने सभेसाठी विशेष व्यवस्था केली आहे. यानुसार काश्मिरी गेटपासून रिसाला रेड लाइनवरील गाड्यांच्या फेर्‍या 26 वरून दुप्पट करण्यात आल्या आहेत.

सभा संपल्यानंतर रोहिणी स्थानकावरून दर तीन मिनिटांनी एक गाडी सोडली जाणार आहे.