आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंतीनिमीत्त मोदींचे मराठीतून Tweet, म्हणाले- महाराजांना अभिमान वाटले असा देश घडवायचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांना ट्विटवरुन अभिवादन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे शूर आणि महान व्यक्तिमत्व आपल्या भूमीत जन्मले याचा भारताला अभिमान असल्याचे मोदींनी ट्विटवर म्हटले आहे. मराठीमध्ये केलेल्या चार ट्विटमध्ये पंतप्रधानांनी महाराजांना अभिमान वाटेल असा भारत घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे म्हटले आहे. 
 
आणखी काय म्हणाले पंतप्रधान 
- 'छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेहमीच प्रजेच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. ते एक उत्तम प्रशासकीय कौशल्य लाभलेले आदर्श राज्यकर्ते होते.'
- 'शिवाजी महाराजांना अभिमान वाटेल असा भारत घडवण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्नशील आहोत.'
- 'नुकतेच अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या भव्य शिवस्मारकचे जल-भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. हा दिवस सदैव स्मरणात राहील.'
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...