आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narendra Modi Visit Plan To America News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका दौरा: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 100 तासांमध्ये 50 कार्यक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/वॉशिंग्टन-पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 सप्टेंबरला पाच दिवसांच्या अमेरिका दौर्‍यासाठी रवाना होणार आहेत. अमेरिकेनेचे मोदींच्या स्वागताची जंगी तयारी सुरु झाली आहे. 100 तासांच्या अमेरिका दौर्‍यादरम्यान नरेंद्र मोदींचे 50 कार्यक्रम होणार आहेत.

नरेंद्र मोदी पहिल्यादाच अमेरिकेचा दौरा करत आहे. उल्लेखनिय म्हणजे भारतीय पंतप्रधानांच्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता सैयद अकबरुद्दीन यांनी मोदी यांच्या अमेरिका दौर्‍याबाबत माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 26 सप्टेंबरला न्यूयॉर्क विमानतळावर मोदींचे भव्य स्वागत होणार आहे. न्यूयॉर्कचे मेयर बिल डे ब्लासियो हे मोदीचे स्वागत करतील. नंतर 'फॉर्च्यून-500'च्या यादीत समावेश झालेल्या जगातीलदिग्गज कंपन्यांचे सीईओ मोदींची भेट घेतील.

क्लिंटन आणि बोएनर यांची भेट घेतील मोदी...
नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांची भेट घेतील. नंतर मोदी अमेरिकेतील प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधतील. यात माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, त्यांची पत्नी व माजी परराष्‍ट्रमंत्री हिलेरी क्लिंटन तसेच साउथ कॅरोलिनाचे राज्यपाल निक्की हेली यांचा समावेश असेल.
भारतीय वंशाचे राज्यपाल बॉबी जिंदल यांच्या भेटीचा उल्लेख कार्यक्रम पत्रिकेत नाही. मात्र, भारतीय वंशांचे अमेरिकन खासदार एमी बेरा यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
अमेरिकन संसदेचे कनिष्ट सभागृह 'हाऊस ऑफ रिप्रजेंटेटिव्ह'चे अध्यक्ष जो बोएनर यांच्यासोबत मोदी चहापानात चर्चा करतील. यावेळी 50 पेक्षा जास्त अमेरिकन खासदारांसोबत चर्चा करतील.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमांची यादी..