आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Will Also Acquire Nuclear War Go Ahead Authority

अणु हल्ल्याची कोणती किल्ली लागणार मोदींच्या हाती, वाचा काय होऊ शकते?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यानंतर औपचारिकपणे देशाचा कारभार त्यांच्या अख्त्यारित येणार आहे. पंतप्रधान बनल्यानंतर मोदी लहान मोठे निर्णय तर घेणार आहेतच, पण त्याचबरोबर एखाद्या आणीबाणीच्या परिस्थितीत अणुहल्ला करण्यासाठी आदेश देण्याचा अधिकारही नरेंद्र मोदींना मिळणार आहे. तज्ज्ञांच्या मते शपथविधीनंतर लगेचच विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या सामर्थ्याबाबतची गोपनीय माहिती नरेंद्र मोदींना देतील.
त्याचबरोबर भारतीय अण्वस्त्र विभागाचे प्रमुख अधिकारी त्यांना शस्त्रांची क्षमता, त्यांचे स्थळ आणि अण्वस्त्र भंडाराविषयी माहिती देतील. अणुहल्ला झाल्यास प्रत्युत्तराच्या कारवाईत आदेश देण्यासाठी ज्या लाँच कोडची गरज भासेल तेही मोदींना दिले जाणार आहेत.

पंतप्रधान बनताच मिळेल गोपनीय माहिती
मोदींनी शपथविधी घेतल्यानंतर तिन्ही सेनाप्रमुख त्यांना लष्करी सामर्थ्य, क्षमता आणि धोक्यांच्या संदर्भात गोपनीय माहिती देतील. लष्करप्रमुख विक्रम सिंह हे 26 ते 28 मे दरम्यान परदेश दौ-यावर जाणार होते. पण ही माहिती देण्यासाठी ते दौरा रद्द करण्याची शक्यता आहे. भारताकडे वायू, जल आणि भू अशा तिन्ही माध्यमातून अणुहल्ला करण्याची क्षमता आहे. मात्र भारत no first-use policy या धोरणाचा म्हणजेच आधी आपण हल्ला न करण्याच्या धोरणाचा अवलंब केला आहे.
पुढे वाचा : अणु हल्ल्याशी संबंधित कोणते अधिकार मिळणार मोदींना