आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत जाणार; नव्या सरकारचा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- भारत- पाकिस्तानमधील बिघडलेले संबंध सुधारण्यास चर्चेला सुरुवात करणारे देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांचे निमंत्रण स्वीकारले आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात वॉशिंग्टनमध्ये होणार्‍या द्विपक्षीय चर्चेत नरेंद्र मोदी सहभाग घेणार आहे.
बराक ओबामा यांनी पाठविलेले आमंत्रण पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारल्यामुळे जगातील दोन मोठे लोकशाहीप्रधान देशांतील संबंध आणखी मजबूत होणार आहेत.

संयुक्त राष्ट्र संघाने या दोन्ही नेत्यांचा बैठकीसाठी तारिख निश्चित केली आहे. 30 सप्टेंबरला हे दोन्ही दिग्गज नेत्यांची भेट होणार असल्याची माहिती केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिली.

अमेरिकेतील भारताचे राजदूत एस. जयशंकर हे आठ जूनला भारतात येत आहेत. ते साऊथ ब्लॉक येथील पंतप्रधान कार्यालयात मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीवेळी दोन्ही देशांत सध्या सुरू असलेल्या संबंधांवर चर्चा होणार आहे. अमेरिकेने 2005 पासून मोदींना व्हिसा देण्यावर घातलेली बंदी या निमित्ताने उठणार आहे.
गुजरातमध्ये दंगल उसळल्यानंतर अमेरिकेने 2005 पासून मोदींना व्हिसा देण्यावर घातलेली बंदी घातली होती. मोदींनी देशाच्या पंतप्रधान पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर अमेरिकेने नुकतेच आपण मोदींबरोबर काम करण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली देशात भाजपचे 'कमळ' फुलले. याबद्दल बराक ओबामा यांनी मोदींना दुरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचवेळी अमेरिकेत येण्याचेही निमंत्रण दिले होते. मोदी यांनी शपथग्रहण केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी पाकिस्‍तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी चर्चाकरून भारत-पाकिस्तानमधील ब‍िघडलेले संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे.