आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाेगस रेशन कार्डांबाबत नरेंद्र माेदींचा दावा खाेटा; राज्यांनी सांगितले, अामच्याकडे नाहीतच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी फेब्रुवारी महिन्यात देशभरातील दाेन काेटी ३३ लाख बाेगस रेशन कार्ड रद्द करण्यात अाल्याचा दावा लाेकसभेत केला हाेता. मात्र अारटीअायद्वारे मिळालेल्या माहितीत हा दावा खाेटा असल्याचे समाेर अाले अाहे.  

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी संसदेत २०१३ ते २०१६ दरम्यान रेशन कार्डची राजनिहाय माहिती संसदेत दिली हाेती. त्याअाधारे माेदींनी ७  फेब्रुवारी २०१७ राेजी सांगितले हाेते की, अाधार कार्ड व तंत्रज्ञानाच्या अाधारे सरकारने ३ काेटी ९५ लाख बाेगस रेशन कार्ड पकडले. त्यानंतर लाेकसभेकडून मिळालेल्या माहितीत या अाकडेवारीत सुधारणा करून २ काेटी ३३ लाख बाेगस रेशन कार्ड असे सांगण्यात अाले हाेते. मात्र अारटीअाय कार्यकर्ती अंजली भारद्वाजने पीएअाेकडे मागितलेल्या माहितीत वरील अाकड्यांचा ताळमेळ बसला नाही. माेदी सरकारने ज्या राज्यांमधून २१ लाख बाेगस रेशन कार्ड मिळाल्याचा दावा केला हाेता त्या राज्यांनी अापल्याकडे एकही बाेगस रेशन कार्ड नसल्याचे अारटीअायमधून स्पष्ट केले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...