आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi\'s Effect Will Be Shown On This Repuplic Day

यंदा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही Modi Effect, मोदींच्या घोषणा देखाव्यांतून मांडणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची तयारी सुरू आहे. - Divya Marathi
फोटो - राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची तयारी सुरू आहे.
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी यावेळी राजपथावर भगव्या रंगाचे वर्चस्व असणार आहे. केंद्र सरकारचे विविध विभाग आणि राज्य सरकार यावेळी देखाव्यांमध्ये अशा बाबींचा किंवा घोषणांचा वापर करणार आहे, ज्या नरेंद्र मोदींसाठी अत्यंत जवळच्या आहेत. मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये त्याचा समावेश असेल याकडे लक्ष असेल.

प्रजासत्ताक दिनी प्रत्येक राज्याचा देखावा सादर होतो असे नाही, तर एका स्पर्धेद्वारे केवळ 16 राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नऊ विभागांची निवड केली जाते. गेल्या वर्षीपर्यंत या देखाव्यांमध्ये विविध योजना किंवा आगामी प्रकल्पांचा समावेश असायचा. पण मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर मात्र, ही स्थिती बदलली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातच्या देखाव्यामध्ये यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' चा देखावा साकरला जाणार आहे. सरदार सरोवर प्रकल्पाजवळ याचे निर्माण करण्यात येणार आहे. मोदींनीच त्याला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हे नाव दिले आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग सीपीडब्ल्यूडीने आधी बागवानी प्रकल्प आपल्या देखाव्याद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पण नंतर गंगा नदीवर लक्ष केंद्रीत करण्यात आला. मोदींनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गंगेची स्वच्छता या मुद्याचा प्रामुख्याने समावेश केला होता. सत्तेत आल्यानंतर त्यांनी लगेचच यावर कामही सुरू केले आहे. डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसीने त्यांच्या देखाव्याला 'मेक इन इंडिया' नाव दिले आहे. मोदींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना मेक इन इंडियाचा नारा देत आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याची विनंती केली होती. महिला आणि बाल विकास मंत्रालय 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' या अभियानासह राजपथावर उतरणार आहे. पंतप्रधान 22 आज हे अभियान सुरू करत आहेत.
उत्तर प्रदेश वेगळ्या मार्गावर
उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पार्टी सरकारने मात्र अत्यंत वेगळ्या विषयावर देखावा केला आहे. 19 व्या शतकातील अखेरचे नवाब वाजीद अली शाह यांच्यावरील हा देखावा असेल. कनार्टकच्या देखाव्यात लाकडापासून चयार करण्यात येणार्‍या चन्नापटनाची खेळणी दाखवली जाणार आहे. आंध्र प्रदेश संक्रांत तर उत्तराखंड केदारनाथ मंदिराचा देखावा सादर करणार आहे. छत्तीसगड बस्तरच्या प्रसिद्ध दसरा महोत्सवाचे सादरीकरण करेल. तर गोवा सरकार मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देणारा देखावा सादर करणार आहे. तर केंद्र सरकारचा अर्थ विभाग सरकारच्या जनधन योजनेचे यश मांडणार आहे.
प्रथमच दिसणार, नक्षल्यांविरोधात लढणारे कोब्रा कमांडो, पाहा PHOTO