आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi For Cabinet Revamp, Arun Jetly May Be Out

मोदींच्या कॅबिनेटमध्‍ये होणार बदल? पीयूष गोयल अर्थ तर जेटलींकडे संरक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेटली आणि मोदी फाइल फोटो. - Divya Marathi
जेटली आणि मोदी फाइल फोटो.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच आपल्‍या कॅबिनेटमध्‍ये बदल करू शकतात, असे वृत्‍त रायटर्स या वृत्‍तसंस्‍थेने दिले. या वृत्‍तानुसार, अरुण जेटलींकडून अर्थ मंत्रालयाचे काम काढून त्‍यांच्‍याकडे संरक्षण मंत्रालयाचे खाते सोपवले जाईल तर पीयूष गोयल यांना अर्थ मंत्री केले जाऊ शकते. जर जेटलींकडे संरक्षण विभागाची जबाबदारी दिली तर मनोहर पर्रिकर यांचे काय होईल, या बाबत सध्‍या तरी काहीही सांगता येणार नाही.
भाजपने काय म्‍हटले ?
- या बाबत भाजपच्‍या प्रवक्‍त्‍यांनी बोलण्‍यास नकार दिला.
का केला जातोय बदल ?
- मोदींना विकास आणि योजनेमध्‍ये गती हवी आहे. त्‍यामुळे ते काही विभागाचे खांदे पालट करत आहेत.
- न्यूज एजेंसी रॉयटर्सच्‍या वृत्‍तानुसार, बिहार निवडणुकीत झालेल्‍या पराभावामुळे सरकारच्‍या प्रतिमेला तडा केला आहे. त्‍यामुळे आरएसएस चिंतेत आहे.
- काम न करणाऱ्या मंत्र्यांना काढावे, यासाठी आरएसएसने दाबाव टाकला आहे.
- मोदींनी रोजगार आणि विकासाबाबत अनेक आश्‍वासने दिली होती. परंतु, दीड वर्ष झाले तरी त्‍या दृष्‍टीने विशेष असे काहीही झाले नाही.
- दुष्‍काळामुळे ग्रामीण विकास थांबला आहे.
मोदींनी आतापर्यंत केला केवळ एकदा बदल
- 26 मे 2014 रोजी मोदी आणि त्‍यांच्‍या मंत्रीमंडळाने शपथ घेतली.
- त्‍यानंतर नोव्‍हेंबर 2014 मध्‍ये कॅबिनेटमध्‍ये बदल केला.
- त्‍यावेळी शिवसेनेचे सुरेश प्रभू आणि गोव्‍याचे तत्‍कालीन मुख्‍यमंत्री यांना कॅबिनेटमध्‍ये सहभागी करून घेतले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कुठून आहेत किती मंत्री ?