आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Narendra Modi\'s Government Com Pleted On Month In Power

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

30 DAYS: मोदी सरकारवर अपे‍क्षा भंग केल्याचा आरोप, मुंबई हायकोर्टात जनहित याचिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली/मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारचे कामकाज सुरु होऊन आज (26 जून) एक महीना पूर्ण झाला. (मोदी सरकारचा एक महीना: जाणून घ्या; महत्त्वाचे निर्णय आणि भविष्यातील रणनिती) मोदी सरकारने अवघ्या एक महिन्यात सरकारी कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. मात्र, विरोधकांनी मोदी सरकारवर देशातील जनतेच्या अपेक्षा भंग केल्याच्या आरोप केला आहे.

'ऑल इंडिया अँटी करप्शन अॅण्ड सिटीजन्स वेलफेअर' या संघटनेने मोदी सरकारसह भाजपला कोर्टात खेचले आहे. संघटनेचे सदस्य आणि अॅड. एम. व्ही. होलमगी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. 'अच्छे दिन आने आले है' असे कॅम्पेन करून भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत बहुमत प्राप्त केल्याचे होलमगी यांनी याचिकेत म्हटले आहे.

नव्या सरकारारने रेल्वे भाडेवाढ करून देशातील जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. महागाई कमी करून ‍जीवनावश्यक वस्तुच्या किमती कमी होतील, या अपेक्षेने देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपला कौल दिला होता.

दुसरीकडे, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात आज (गुरुवारी) निवडक मंत्र्यांसोबत चर्चा केली. पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या बैठकीत अर्थमंत्री अरुण जेटली, ग्राहक, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान, कृषिमंत्री राधा मोहन सिंह आणि गृहमंत्री राजनाथसिंह उपस्थित होते. बैठकीत महागाई आणि अन्न सुरक्षेबाबत चर्चा करण्‍यात आली. बैठकीत उपस्थित मंत्र्यांनी प्रस्तावही सादर केले आहे.

अॅड. होलमगी यांनी न्यायमूर्ती अभय ओका आणि न्यायमूती ए. चंदूरकर यांच्या खंडपीठात बुधवारी याचिका सादर केली. यावर कोर्टाने सांगितले, की रेल्वे भाडेवाढीला विरोध करणारी एक जनहीत याचिका याआधी (मंगळवारी) फेटाळण्यात आली होती. अॅड. होलमगी यांच्या याचिकेवर प्रशासनानेही आक्षेप घेतला आहे. परिणामी कोर्टाने अॅड. होलमगी यांची याचिका फेटाळून लावली.

काय आहे याचिकात?
अॅड. होलमगी यांच्या मते, देशातील जनतेला 'अच्छे दिन आने आले है' असे अमिष दाखवून भाजपने आपला उद्देश साध्य केला. चांगले दिवस येतील या अपेक्षेने जनतेने भाजपच्या बाजूने विजयी कौल दिला. मात्र, भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर अवघ्या एका महिन्यात रेल्वे भाडेवाढ करून देशातील जनतेचा अपेक्षाभंग केला. महागाई कमी होऊन 'अच्छे दिन' येतील, यासाठी देशातील मतदारांनी आपले अमुल्य मत भाजपच्या झोळीत टाकले होते. याचिकेत पंतप्रधान मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री आणि भाजपला प्रतिवादी बनवण्यात आले आहे.

[फोटो- मोदी सरकारला एक महीना पूर्ण झाल्यानंतर कॉंग्रेसने टार्गेट केले आहे. कॉंग्रेसने 'ट्विटर' वर वरील छायाचित्र पोस्ट केले आहे.]