आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modis Man Ki Baat On Radio News In Divya Marathi

VIDEO: पंतप्रधान मोदींची रेडिओवरून \'मन की बात\'; दर रविवारी प्रसारित होणार कार्यक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- टीव्ही, इंटरनेट आणि सोशल नेटवर्कींगवर आपली छाप उमटवल्यानतंर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता 'रेडिओ' या माध्यमाकडे वळले आहेत. आज (शुक्रवार) पंतप्रधानांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा पहिला भाग 'आकाशवाणी’वरून प्रसारीत झाला. त्यामुळे आता अनेक वर्षांपासून मागे पडलेल्या 'ऑल इंडिया रेडिओ'ला (AIR) सुध्दा अच्छे दिन दाखवण्याचा मोदींनी चंग बांधला आहे.
पूर्वी पंडीत जवाहरलाल नेहरू ते इंदिरा गांधी पर्यंतचे पंतप्रधान रेडिओच्या माध्यमातून जनतेशी संपर्क साधायचे. मात्र त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा विकासामुळे तसेच टीव्हीच्या आगमनामुळे रेडीओ हे माध्यम मागे पडले. मात्र नरेंद्र मोदींनी या अत्यंत मोठ्या आणि प्रभावी माध्यमाचा वापर करून जनसामान्यांपर्यंत पोहोचणे तसेच रेडिओ क्षेत्राचा विकास करणे याकडेही पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘'मन की बात' ’ हा कार्यक्रम आठवड्याच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारीत करण्यात येईल.
पुढील स्लाईडवर वाचा, नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमातील मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे....