आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ललितगेट\'वर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे \'मन की बात\' करतानाही \'मौन\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमधील परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर माजी आयपीएल आयुक्त ललित मोदी यांना केलेल्या कथित मदतीच्या आरोपानंतर पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी सर्व विरोधीपक्षांनी केली. मात्र रविवारी झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमतही पंतप्रधान मोदींनी 'ललितगेट'वरील मौन सोडले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमातून राजपथ योगपथ झाल्याचा पुनरुच्चार केला. 21 जून रोजी माझे मन प्रफुल्लीत झाल्याचे ते म्हणाले. जगाला भारताला समजून घेण्याची उत्सूकता निर्माण झाली आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत. त्याची जगाला ओळख करुन देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपली कुटुंब संस्था ही जगात सर्वोत्तम आहे. त्याची ओळख जगाला करुन दिली तर मला विश्वास आहे, की नक्कीच त्यांना आश्चर्य वाटेल.

पंतप्रधानांनी नागरिकांनी उन्हाळ्याच्या सुट्यातील शेअर केलेल्या छायाचित्रांचे अभिनंदन केले.

योगा दिवसाबद्दल ...
21 जून रोजी माझे मन अतिशय प्रफुल्लीत झाले. यूनोमध्ये योगदिनाचा विषय मांडताना याला जगभरातून एवढा प्रतिसाद मिळेल याची आपेक्षा नव्हती. 21 जून रोजी जिथे-जिथे सूर्योदय झाला तिथे-तिथे लोकांनी योग केला. योग अभ्यासच्या जगतात सूर्य मावळत नाही हे अधिकारवाणीने आज सांगता येते. संपूर्ण जगाने योग स्विकारला आहे, ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बान की मुन यांना योग करताना पाहून आनंद वाटला.
भारतीय कुटुंब संस्था...
भारतातबद्दल जाणून घेण्याची जगाला उत्सूकता लागली आहे. आपल्या अनेक परंपरा अशा आहेत ज्यांच्याबद्दल माहिती घेतल्यानंतर जगाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. मला विश्वास आहे, की भारतीय कुटुंब संस्था ही जगातील सर्वोत्तम कुटुंब संस्था आहे. याची जगाला ओळख करुन दिली पाहिजे.
मुली आणि महिलांची सुरक्षा
बेटी बचाओ - बेटी पढाओ अभियान केवळ योजना न राहाता जनआंदोलन झाले पाहिजे. हरियाणाच्या एका गावातील सरपंचाने स्वतःच्या मुलीसोबतचा फोटो ट्विट केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना पंतप्रधानांनी इतरही पालकांनी आपल्या मुलीसोबतचे फोटो ट्विटरवर शेअर करण्याचे आवाहन केले आणि त्याला रिट्विटर करण्याचा आश्वासन दिले. मुलींना वाढवले पाहिजे आणि त्यांना शिकवले पाहिजे असे मोदींनी सांगितले.
पंतप्रधानांची 'मन की बात'
- पाणी आडवले पाहिजे आणि जिरवले पाहिजे.
- देशात स्मार्ट सिटी तयार करण्याचे लक्ष्य.
- सर्वांना घर देण्याची सरकारची इच्छा.
- भारत देश विविधतेने नटलेला आहे.
- स्वच्छता सर्वात महत्त्वाची.
- एक झाड लावून त्याच्याजवळ जूना माठ ठेवा आणि त्यात पाणी भरा.
- रक्षाबंधनला घरातील धूनी-भांडी करणाऱ्या महिलांच्या नावाने अटल पेंशन योजना सुरु करा.
- बेटी बचाव - बेटी पढाओ योजना जनआंदोलन झाले पाहिजे.
- तुम्ही तुमच्या मुलीसोबतचा फोटो ट्विट करा, मी त्याला रिट्विट करेल.
- आंतरराष्ट्रीय योगा दिवस एका दिवसासाठी नाही तर, जीवनाचा अविभाज्य भाग बनवा.