आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi\'s Popularity Soaring, 57 Percent See Him As Best Person For PM Post

SURVEY : 76 टक्के लोकांना नरेंद्र मोदींच्या राज्यात वाटते सुरक्षिततेती भावना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात सुरक्षिततेची भावना असल्याचे मत 76 टक्के लोकांनी व्यक्त केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडे ग्रुप आणि हंसा रिसर्चच्या वतीने करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणात काही तथ्ये समोर आली आहेत.
90 टक्के नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कामकाज खूप विशेष वाटत नसल्याचे चित्र आहे. केवळ 10 टक्के लोकांनी सरकारचे काम खूपच चांगले असल्याचे म्हटले आहे. तर प्रामाणिकपणाच्या मुद्यावर मात्र 36 टक्के नागरिकांनी मोदींना पाठिंबा दर्शवला. तर केजरीवाल हे प्रामाणिक असल्याचे केवळ 4 टक्के लोक म्हणाले.

सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्या 57 टक्के लोकांच्या मते मोदी पंतप्रधानपदासाठी सर्वात योग्य आहेत. त्याशिवाय 78 टक्के लोकांनी मोदींच्या मंत्रिमंडळाच्या कामकाजाते कौतुक केले आहे. तर 47 टक्के लोकांच्या मते मोदी आरएसएसचा अजेंडा पुढे नेण्यात यशस्वी ठरू शकतील. हे सर्व्हेक्षण 3-14 ऑगस्ट दरम्यान 108 लोकसभा मतदारसंघात करण्यात आले होते. त्यासाठी 29 राज्यांच्या 12430 लोकांची मते विचारात घेण्यात आली.
पंतप्रधान म्हणून मोदींचे काम?
पीएम म्हणून मोदींचे काम कसे आहे? या प्रश्नावर केवळ 10 टक्के लोकांनी खूप चांगले असे उत्तर दिले. तर 51 टक्के चांगले, 28 टक्के सरासरी आणि 6 टक्के लोक काम खराब असल्याचे म्हणाले. मोदींच्या मंत्रिमंडळाला 78 टक्के लोकांनी चांगले तर 9 टक्क्यांनी वाईट असल्याचे सांगितले. मोदींच्या नेतृत्वातील भाजपच्या कामगिरीला 68 टक्के लोकांनी पसंती दर्शवली. 20 टक्के लोक सरासरी, दोन टक्के खूप चांगले आणि 5 टक्के लोक हे काम खूप वाईट असल्याचे म्हणाले.

केजरीवालांना केवळ 4 टक्के ?
सर्वात प्रामाणिक नेता कोण? या प्रश्नाला उत्तर देताना सर्वाधिक 36 टक्के मते मोदींना मिळाली. तर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना केवळ 4 टक्के मते मिळाली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना 5 टक्के तर राहुल गांधींनाही 4 टक्केच मते मिळाली.

सुरक्षेची भावना
मोदींच्या राज्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होते का? या प्रश्नाला 76 टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिले. तर 19 टक्क्यांचे उत्तर नकारार्थी आले.

गरीबी आणि महागाईवर काम करावे
मोदी सरकारने सर्वात आधी कोणत्या मुद्यावर काम करावे असे विचारण्यात आले त्यावर, बहुतांश लोकांनी गरीबी, महागाई आणि भ्रष्‍टाचाराचा उल्लेख केला. 18 टक्के लोक महागाई, 22 टक्के लोक भ्रष्टाचार आणि 9 टक्के लोक महिला सुरक्षा असे म्हणाले. 23 टक्के लोकांनी गरीबीला प्राथमिकता दर्शवली.

मोदींची ओळख कशी
मोदींची ओळख काय? असे विचारण्यात आले तेव्हा 46 टक्के लोकांनी ते विकास पुरुष असल्याचे सांगितले. तर 24 टक्के लोकांनी सुशासन, 9 टक्के लोकांनी हिंदु राष्ट्रवाद आणि 4 टक्के लोकांनी त्यांना धार्मिकतेच्या चष्म्यातून पाहिले. मोदी संघाच्या इशा-यावर काम करतील का? असा प्रश्न विचारला तेव्हा 47 टक्के लोकांनी ते स्वतःच्या निर्णयानुसार काम करतील असे मत मांडले तर 12 टक्के लोकांनी त्यांच्यावर संघाचे नियंत्रण राहू शकते असे म्हटले. 31 टक्के लोकांच्या मते ते मधला मार्ग निवडू शकतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मोदींचे पंतप्रधान म्हणून काम करतानाचे काही PHOTOS, हे सर्व फोटो पीएमओच्या ट्वीटर अकाऊंटवरून घेण्यात आले आहेत.