आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेदींवरून भाजपत वाद : नरेंद्र टंडन यांचा राजीनामा, नंतर मात्र माघार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून किरण बेदींचे नाव जाहीर केल्यामुळे भाजपच्या नेत्यांमध्ये राजकीय नाट्य चांगलेच रंगले. निवडणूक सहायक नरेंद्र टंडन यांनी पार्टी अध्यक्ष अमित शहा यांना राजीनाम्याचे पत्र धाडले. त्यानंतर शहांची भेट घेतल्यावर टंडन यांनी राजीनामा मागे घेतला.

मात्र राजीनाम्याच्या पत्रात टंडन यांनी किरण बेदींच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न अध्यक्षांसमोर उपस्थित केले. त्यामुळेच पक्षातील अंतर्गत मतभेद समोर आले. टंडन यांनी आपल्या पत्रात लिहिले, ‘मी गेल्या ३० वर्षांपासून पार्टीत आहे. किरण बेदींनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला होता. त्याच आता आमच्यावर राज्य करणार. आता त्या आम्हाला डिक्टेशन देत आहेत, हे असह्य आहे. बेदी मला सतत अपमानीत करत असत. टंडन यांनी दिल्लीच्या संघटन प्रमुखावर भ्रष्टाचाराचा आरोपही केला. मात्र अमित शहा यांची भेट घेतल्यावर त्यांनी राजीनामा परत घेतला. मी जरा भावुक झालो होतो. मात्र आता मी राजीनामा परत घेत आहे, असे ते म्हणाले.