आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रत्नागिरी : मोठी दूर्घटना टळली, विना चालक 15 KM धावली राजधानी एक्स्प्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/मुंबई - मडगाव-निझामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा मोठा अपघात होता-होता वाचला. ट्रेन उतारावर विनाचालक 15 किलोमीटर धावली. उतार संपून चढ आल्यानंतर जेव्हा ट्रेन स्लो झाली तेव्हा गार्ड रुमध्ये बसलेल्या ड्रायव्हरने मोठ्या हिंमतीने इंजीनवर चढून ट्रेनवर नियंत्रण मिळवले. ही घटना रत्नागिरीजवळ घडली. रेल्वेने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मोठी दुर्घटना टळली
- एका इंग्रजी दैनिकातील वृत्तानुसार, रत्नागिरी रेल्वेस्टेशनजव सोमवारी ट्रेनचे इंजिन खराब झाले होते. सांयकाळी 5.50 वाजता एका भूयाराजवळ ट्रेन उभी होती.
- काही तंत्रज्ञ रेल्वे इंजिनमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच दरम्यान ट्रेन हळूहळू पुढे सरकायला लागली. उतार असल्यामुळे लवरच ट्रेन वेगात धावायला लागली.
- सूत्रांनी सांगितले, की राजधानी एक्स्प्रेसचा चालक तेव्हा गार्डच्या कॅबिनमध्ये होता.
- सुदैवाने थोड्याच अंतरावर चढ होता त्यामुळे ट्रेनची स्पिड कमी झाली.
- दरम्यान धावत्या गाडीच्या इंजिनावर चढण्यात चालकाला यश आले आमि त्यांनी ट्रेनवर नियंत्रण मिळवले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...