आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये तापमान 8.6 वर, लेहचा पारा उणे अंशात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रासोबतच देशाच्या उत्तर भागातही सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. काश्मिरातील लेहमध्ये तापमानाचा पारा उणे १३ अंशांच्याही खाली घसरला असून राजस्थानात थंडीमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात नाशिकमध्ये तापमानाने ८.६ अंशांचा पारा गाठला.

उत्तरेकडील २५ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून ३० चे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. खराब हवामानाचा देशातील विमान वाहतूक सेवेवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मिरात संपूर्ण काश्मिरात सध्या रात्रीचे तापमान शून्य अंशाखाली आहे. सीमावर्ती लेह परिसरात देशातील सर्वाधिक थंडी आहे. येथे तापमान उणे १३ अंशांच्या खाली पोहोचले आहे.
नाशिकमध्ये तापमान ८.६ अंश सेल्सियसवर
महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून लोकांना गारठ्याचा अनुभव येत आहे. मंगळवारी नाशिकमध्ये राज्यातील सर्वात कमी ८.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. मंगळवारी विदर्भाच्या तुरळक भागात पाऊसही पडला. दरम्यान, पुढील काही दिवस हवामान कोरडे राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.