आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MP Hussain Dalwai Leveled Allegations On BJP In Connection With Nathuram Godse

महाराष्ट्रात झाला नत्थुराम गोडसे शौर्यदिवस, हुसैन दलवाई यांचा राज्यसभेत आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पुरोगामी महाराष्ट्रात नत्थुराम गोडसे शौर्यदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ठार मारणाऱ्या व्यक्तीचा शौर्यदिवस मुद्दाम साजरा केला जात आहे. यासाठी भाजपच्या दोन आमदारांना निमंत्रणे पाठविण्यात आली होती, असा आरोप खासदार हुसैन दलवाई यांनी आज (गुरुवार) राज्यसभेत केला.
यासंदर्भात बोलताना हुसैन दलवाई म्हणाले, की आग्र्यात बळजबरीने धर्मांतरण केले जात आहे. आता नत्थुराम गोडसे यांचा शौर्यदिवस साजरा केला जात आहे. यासंदर्भात मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
दलवाई यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षाचे खासदार सभापतींसमोर असलेल्या मोकळ्या जागी जमा झाले. त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी सत्ताधारी खासदारही दलवाई यांच्यावर टिका करताना दिसून आले.
दलवाई यांना उत्तर देताना संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी म्हणाले, की महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्याचे आम्ही कोणत्याही स्वरुपात समर्थन केलेले नाही. परंतु, दलवाई यांनी जी भाषा वापरली ती संसदीय नाही. याचा आम्ही निषेध करतो.
यावेळी उपसभापती पी. जे. कुरिअन कामकाज बघत होते. त्यांनी कामकाज काही काळासाठी स्थगित केले. परंतु, सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यावर पुन्हा गोंधळ झाला. कुरिअन यांनी पुन्हा सभागृह तहकूब केले.
या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मल्याळम दैनिकात संपादकीय छापून आले होते. त्यात म्हटले होते, की जवाहरलाल नेहरुंपेक्षा नत्थुराम गोडसे चांगले होते. नत्थुराम यांनी गांधींना वाकून नमस्कार करुन गोळ्या झाडल्या होत्या. पण नेहरुंनी तोंडावर गोड बोलून त्यांच्या पाठित खंजीर खुपसला होता.
भाजपचे खासदार साक्षी महाराज म्हणाले, नत्थुराम गोडसे खरा देशभक्त... वाचा पुढील स्लाईडवर...