आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nation First Woman Centrel University In Constituncy Of Sonia Gandhi Rieberal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनिया गांधी यांच्या रायबरेलीत पहिले महिला केंद्रीय विद्यापीठ स्थापन होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघात देशातील पहिले महिला केंद्रीय विद्यापीठ तसेच पहिले नागरी उड्डयन विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. 500 रुपये कोटी खर्च करून उभारल्या जाणा-या महिला विद्यापीठाला माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचे, तर नागरी उड्डयन विद्यापीठाला राजीव गांधी यांचे नाव दिले जाणार आहे. इंदिरा गांधी याच मतदारसंघातून निवडून येत होत्या.


केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 2 लाखांऐवजी साडेचार लाख करण्याचा निर्णयही बैठकीत झाला. दरम्यान, दोन्ही विद्यापीठांच्या स्थापनेसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वेगवेगळी विधेयके मांडली जाणार आहेत. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला नसल्याचा दावा केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी बैठकीनंतर बोलताना केला.