आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी नव्हे तर प्रियांकांमध्ये इंदिरांना दिसत होता आपला उत्तराधिकारी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिरा गांधी आपल्या लाडक्या राहुल व प्रियांका या नातवांसोबत... - Divya Marathi
इंदिरा गांधी आपल्या लाडक्या राहुल व प्रियांका या नातवांसोबत...
नवी दिल्ली- आयर्न लेडी आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींना मंगळवारी 33 व्या पुण्यतिथी दिनी देशभरात आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्ताने आज आपण इंदिरा गांधी यांच्याबाबत जाणून घेणार आहोत. आज आपण इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय राहिलेले एम. एल. फोतेदार यांनी केलेल्या खुलाशाबात माहिती घेणार आहोत. फोतेदार यांनी आपल्या पुस्तकात दावा केला होता की, इंदिरा गांधी यांना त्यांची उत्तराधिकारी प्रियांका व्हावी अशी इच्छा होती. सोबतच इंदिरा गांधींना आपला शेवट जवळ आला आहे याची हत्येआधीच कूनकून लागली होती असे फोतेदार यांनी आपल्या पुस्तकात म्हटले होते. प्रियांका खूप काळ गाजवेल सत्ता...
 
- ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरांनी काश्मीरचा दौरा केला होता. तिथे त्या एका हिंदू आणि एका मुस्लिम धार्मिकस्थळी गेल्या होत्या. 
- हिंदू मंदिरात इंदिरा गांधींनी असे काही पाहिले की त्यांना वाटायला लागले की आपले जीवन आता शेवटाच्या जवळ आले आहे. 
- त्यानंतर बऱ्याच विचारांती त्यांनी असे म्हटले होते, की प्रियंकाला राजकारणात मोठे यश मिळू शकते आणि बराच काळ ती सत्तेत राहू शकते.
 
इंदिरा गांधींना स्वतःचा अंत जवळ आल्याचे कसे कळले?
 
- फोतेदार यांनी पुस्तकात म्हटले आहे की, इंदिरा गांधींनी मंदिरात एक सुकलेले झाड पाहिले होते. त्याचा अर्थ त्यांनी, आपले जीवन आता अंताच्या जवळ आले असल्याचा काढला होता.
- फोतेदार म्हणतात, इंदिरांना लक्षात आले की माझ्या नजरेतूनही या गोष्टी सुटलेल्या नाहीत. मग रेस्ट हाऊसकडे जातांना त्यांनीच माझ्याकडे मन मोकळे करत या गोष्टीचा उल्लेख केला.
- फोतेदार यांनी आपल्या 'चिनार लीव्स' (चिनाराची पाने) या पुस्तकात वरील भाष्य केले आहे.
 
पुढील स्लाईडमध्ये पाहा, नातवांसोबत इंदिरा गांधींचे फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...