आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील दोन महिलांना नारीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशिया खंडातील पहिली महिला रेल्वे चालक मुंबई येथील मुमताज काझी आणि मुंबईच्याच महिला उद्योजिका रिमा साठे यांना उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते बुधवारी नवी दिल्लीत ‘नारीशक्ती’ या  राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  हॅप्पी रूट्स फुड्स अँड ब्रेवरेज इंडिया प्रा.लि. उद्योग समूहाच्या प्रमुख रिमा साठे यांनी कांदा, टोमॅटो, धान्य आणि पोल्ट्री उत्पादनाची श्रृंखला निर्माण करून ‘थेट कृषी उत्पादन नेटवर्किंगद्वारे’ राज्यातील १२ हजार अल्पभूधारक शेतकरी व आदिवासी शेतकऱ्यांना जोडले.  सामुदायिक कुक्कुटपालनाअंतर्गत त्यांनी १५ हजार महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला अाहे.
बातम्या आणखी आहेत...