आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National Awards For Outstanding Service In The Field Of Alcoholism

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘व्यसनमुक्ती’साठी 4 पुरस्कार, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वितरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - व्यसनमुक्ती समाजनिर्मितीसाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍या राज्यातील चार संस्था व व्यक्तींना राजधानी दिल्लीत गुरुवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या क्षेत्रात देशात सर्वाधिक पुरस्कार महाराष्ट्राला प्राप्त झाले आहेत. मुक्तांगण मित्रच्या मुक्ता पुणतांबेकर, पुण्याच्या कृपा फाउंडेशनचे तुषार संपत या संस्थांसह फादर जोसेफ हिलेरी परेरा व बोस्को मायकल डिसुझा यांचा राष्ट्रपतींनी गौरव केला.
26 जून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दुरुपयोग तसेच अवैध व्यापार विरोधी दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून येथील विज्ञान भवनात सामाजिक न्याय विभागातर्फे गुरुवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत, सामाजिक न्याय राज्यमंत्री सुदर्शन भगत, सचिव सुधीर भार्गव, अवर सचिव अनुप कुमार र्शीवास्तव उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते 2013 साठीच्या ‘सेवा राष्ट्रीय पुरस्काराचे’ वितरण करण्यात आले. हे पुरस्कार 10 र्शेणीमध्ये दिले जातात. महाराष्ट्रातील ‘मुक्तांगण मित्र’ या संस्थेला सर्वर्शेष्ठ र्शेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांनी स्वीकारला. व्यावसायिक क्षेत्रात व्यसनमुक्तीचे उल्लेखनीय कार्याबद्दल मुंबई येथील फादर जोसेफ हिलेरी परेरा यांना वैयक्तिक र्शेणीतील पुरस्काराने गौरवण्यात आले.
कृपा फाउंडेशन या अशासकीय संस्थेच्या माध्यमातून मागील 32 वर्षांपासून ते अंमली पदार्थ प्रतिबंधक आणि अशा वस्तूंचा पुरवठा कमी व्हावा याकरिता कार्य करीत आहेत. या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांचा संदेश त्यांचे प्रतिनिधी क्रस्टिना अल्बर्टे यांनी वाचून दाखविला.

छायाचित्र : व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍या देशभरातील विविध संस्था, व्यक्तींना गुरुवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी गौरवप्राप्त मान्यवरांनी अशी पोझ दिली.