आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Election Program News In Marathi, Tomorrow Press Meet

लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची थोड्याच वेळात घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची उद्या (बुधवारी) जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी सकाळी 10.30 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. यात लोकसभा निवडणुकांचा तारखा जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यावर लगेचच देशभरात आचारसंहिता लागू होणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी येत्या एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून मे मध्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्याचे संकेत गेल्या आठवड्यात मिळाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 81 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सध्याच्या लोकसभेची मुदत एक जून रोजी संपत आहे. त्यामुळे 31 मे 2014 पूर्व देशात निवडणुका होऊन नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची यादी राष्ट्रपतींकडे देणे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे.


याबरोबर निवडणूक खर्च मर्यादेत वाढ- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार खर्चाची मर्यादा 40 लाखांवरून 70 लाख रुपये करण्यात आली आहे. मतदान यंत्रांवरील उमेदवारांच्या यादीत आता ‘वरीलपैकी कुणीही नाही’ (नोटा) या बटणाचा पर्यायही मिळणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसह त्याचे कागदोपत्री रेकॉर्डही ठेवले जाणार आहे.

दरम्यान, 2009 मध्ये लोकसभा निवडणुकांसाठी 16 एप्रिल ते 13 मे या काळात पाच टप्प्यात मतदान करण्‍यात आले होते.