आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Giriraj Singh Passes Racial Comment On Sonia Gandhi

लालू यादव म्हणाले, गिरिराज यांना चोळी-बांगडी घाला, काँग्रेसचे आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/पाटणा - सोनिया गांधीवर वर्णद्वेषी टिप्पणी करणारे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरिराजसिंह यांच्याविरोधात काँग्रेसने देशभरात आंदोलन सुरु केला आहे. बुधवारी गिरिराज यांच्या पाटणा येथील निवासस्थानी अंडी आणि टॉमॅटो फेकण्यात आले. तसेच, त्यांच्या निवासस्थानाबाहेरील भाजपचे होर्डिंग फाडण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजीनंतर गिरिराज यांच्या निवास्थानाबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
गुरुवारी दिल्लीसह मुंबई आणि देशातील इतरही ठिकाणी संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी गिरिराजविरोधी आंदोलन सुरु केले आहे. त्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी गिरिराज यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'सर्वांना माहित आहे, गिरिराज यांची पार्श्वभूमी काय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक फर्जीवाडा आहे. या संघटनेचे अनेक बोगस नेते आहेत. गिरिराज यांना चोळी- बांगड्या देऊन त्यांच्या तोंडाला काळे फासले पाहिजे.' लालू यादव म्हणाले, असे विधान करणार्‍यांना शिक्षा देण्यासाठी देशात कठोर कायदा झाला पाहिजे. अशी विधाने गांभीर्याने घेतली पाहिजे. देशात लोकशाही आहे, असे विधान करुन लोक माफी मागतात आणि सर्व त्यावर समाधान मानतात. हे पुरेसे नाही.
माझे स्टींग करु नका
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल मंगळवारी वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी पत्रकारांना आधीच सांगितले होते, की अरविंद केजरीवाल सारखे माझे स्टिंग करु नका.
मंगळवारी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्लीहून पाटण्याला आलेले गिरिराज यांनी सुरुवातीला नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्यानंतर आपला मोर्चा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे वळवला. ते पत्रकारांना विनोदात म्हणाले, हे विधान ऑफ द रेकॉर्ड आहे, माझे स्टिंग वगैरे करु नका. कदाचित पत्रकार परिषदेनंतर स्टिंग होण्याची त्यांनी भीती होती, म्हणूनच त्यांनी आधी पत्रकारांना तसे करु नका अशी सुचना केली. ते म्हणाले ही अनौपचारिक चर्चा आहे. तुमचे माइक आणि कॅमेरे बंद करुन ठेवा.
पाटण्यात युवक काँग्रेसने गिरिराजसिंह यांच्या घरावेर फेकले अंडे-टॉमॅटो
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री गिरिराज यांच्या पाटणा येथील निवासस्थानाला बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी वेढा टाकला होता. त्यांच्याविरोधात जोरदार आंदोलन सुरु करण्यात आले आहे. बुधवारी पाटणा येथील निवास्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. युवा कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरावर अंडी आणि टॉमॅटो फेकले. गुरुवारी दिल्लीसह देशातील विविध ठिकाणी काँग्रेस गिरिराज यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करत आहे.
पुढील स्लाइडमध्ये, 'गोरी कातडी' विधानावर गिरिराज यांना शाह यांची वार्निंग, कारवाई मात्र होणार नाही