आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेटलींनी कॉंग्रेसचे आरोप फेटाळले, राहुल व सोनियांनी कोर्टात उत्तर द्यावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नॅशनल हेरॉल्डप्रकरणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची याचिका फेटाळून लावणाऱ्या न्यायाधिशांनी आज (मंगळवारी) सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे, या प्रकरणी कॉंग्रेस पक्षाने मोदी सरकारवर राजकीय सूड उगवल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज सकाळीच पुदुचेरीला गेले. त्यानंतर ते चेन्नईचीही हवाई पाहणी करणार आहेत.

दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी कॉंग्रेसचे सर्व आरोप फेटाळले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी भाजप सरकारचा काहीही संबंध नाही. ही एक खासगी तक्रार होती. सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी कोर्टात उत्तर द्यावे. संसदेचे कामकाज रोखू नये, असेही जेटलींनी म्हटले आहे.
या प्रकरणी न्यायालयात आज हजर राहण्याबाबत पतियाळा कोर्टाच्या समन्सला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली होती. त्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना सोनिया गांधी म्हणाल्या होत्या, की मी इंदिरा गांधी यांची सून आहे. मी कुणालाही घाबरणार नाही.
काय म्हणाले राहुल गांधी
राहुल यांनी ट्विट टाकले आहे, की उद्या, 8 डिसेंबर, मंगळवार पुदुचेरी आणि चेन्नईची हवाई पाहणी करणार आहे. विशेष म्हणजे ही ट्विट टाकताना त्यांनी तारीख, वार आणि दिवसाचा आवर्जून उल्लेख केला आहे. आता या प्रकरणी 19 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
पूरपरिस्थितीची पाहणी केल्यावर राहुल म्हणाले
हे पूर्णपणे राजकीय सूडाचे प्रकरण आहे. केंद्र सरकार अशा प्रकारे मला गप्प बसवण्याचा आणि प्रश्न विचारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करते. पण मी असे होऊ देणार नाही. मी प्रश्न विचारत राहिन. सरकारवर दबाव टाकत राहिन. याचे उत्तर मी आता संसदेत देईन.
व्यंकया नायडू म्हणाले
- कॉंग्रेसची भूमिका समजण्यासारखी नाही. त्यांना संसद सुरळीतपणे सुरु ठेवायची नाही.
- भारतीय न्याय व्यवस्था पूर्णपणे स्वतंत्र आहे. या प्रकरणाशी सरकारचा काहीएक संबंध नाही.
मुख्तार अब्बास नकवी म्हणाले
- न्यायालय ठरवेल की कोण गुन्हेगार आहे आणि निरपराध. न्यायालय आपले काम करीत आहे.
- या प्रकरणी संसदेत गोंधळ घालण्यात आल्याने आता काहीतरी गडबड असल्याचा संशय येतो.
काय आहे प्रकरण
या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयात व्यक्तिश: हजर राहण्यापासून सूट देण्याची मागणी करणारी दुसरी याचिकाही हायकोर्टाने फेटाळली होती. सोनिया व राहुलना आज हजर राहण्याचे निर्देश देणारे समन्स पतियाळा कोर्टाने बजावले होते. याचिका फेटाळल्यामुळे या दोघांसह सुमन दुबे, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया लिमिटेडला आज न्यायालयात हजर राहावे लागणार होते. नॅशनल हेरॉल्डच्या मालकीसाठी निधीचा गैरवापर केल्याची तक्रार भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी दाखल केल्यानंतर पतियाळा कोर्टाने समन्स बजावले होते.

पुढील स्लाइडवर वाचा,कॉंग्रेसने संसदेत उचलला मुद्दा