नवी दिल्ली- बहुचर्चित नॅशनल हेरॉल्डप्रकरणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अंमलबजावणी संचानालयाने सोनिया आणि राहुल यांच्या विरोधात चौकशी सुरु केली आहे. मात्र, सोनिया आणि राहुल यांच्याविरुद्ध खटला बनतो की नाही, याविषयी आधी तपासले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दुसरीकडे, या प्रकरणी सोनिया-राहुल यांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज (शुक्रवार) सुनावणी होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून गेल्या महिन्यात पटीयाळा हाऊस कोर्टाने सोनिया व राहुल यांना समन्स बजावले होते. तसेच सात ऑगस्ट रोजी होणाण्या सुनावणीला त्यांना कोर्टात हजर राहण्याचेही आदेश दिले होते. या समन्सला सोनिया गांधी आणि राहुल यांनी बुधवारी हायकोर्टात आव्हान दिले होते.
विशेष म्हणजे पटियाळा हाऊस कोर्टाने याप्रकरणात सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी यांना आरोपी केले आहे. याशिवाय कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा, सॅम पित्रोदा, ऑस्कर फर्नांडिस आणि सुमन दूबे यांनाही कोर्टाने समन्स बजावले होते.
नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राच्या व्यवहारात सर्व नियम धाब्यावर ठेवण्यात आल्याचा आरोप सुब्रह्मणयम स्वामी यांनी केला आहे. या प्रकरणी मोठा गैरव्यवहार झाल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे. नॅशनल हेरॉल्ड वृत्त पत्र अनेक वर्षांपासून बंद आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, पंडित जवाहललाल नेहरुंनी केली होती नॅशनल हेरॉल्डची स्थापना...
(फोटो: सोनिया गांधी आणि राहुल गांधी)