आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Herald Case: Sonia Rahul Petition Rejected

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया-राहूल यांचा अर्ज फेटाळला, उद्या न्यायालयात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नॅशनल हेराल्ड प्रकरणी कॉंग्रेस पक्षाच्या अध्‍यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्‍यक्ष राहूल गांधी यांना मंगळवारी पटियाला हाऊस न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी(ता. सात) दोघांनाही सूट देण्‍यास नकार दिला. कॉंग्रेस या निर्णयाच्या विरुध्‍द सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.
सोनिया आणि राहूल गांधींव्यतिरिक्त कॉंग्रेस नेते मोतीलाल बोरा, ऑस्कर फर्नांडीस, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांनाही उद्या (मंगळवारी) न्यायालयात हजर राहावे लागेल. नॅशनल हेराल्ड प्रकरणाची सुनावणी दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात चालू आहे. पक्षाचे प्रवक्ता मनू सिंघवी म्हणाले, की पक्ष उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुध्‍द मंगळवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहे.
प्रकरण काय आहे ?
- कॉंग्रेस नेत्यांवर आरोप आहे, की पक्ष निधीतून नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राला 90 कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले. नंतर मौल्यवान संपत्ती हडप करण्‍याच्या उद्देशाने केवळ 50 लाख रुपयांत खरेदी केली गेली.
- या प्रकरणी भाजप नेता सुब्रह्मण्‍यम स्वामी यांनी सोनिया आणि राहूल गांधींविरुध्‍द कर चुकवेगिरी आणि फसवणूकचा खटला दाखल केला होता.
- स्वामी यांच्या तक्रारीनंतर दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाच्या निर्देशानंतर अंमलबजावणी संचालनालयाने सोनिया आणि राहूलवर प्राथमिक चौकशीचा खटला भरला.
- फेमा उल्लंघन सिध्‍द झाल्याने दोघांवर खटला भरला गेला.