मुंबई आणि दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचा एनआयएचा इशारा
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजधानी दिल्ली व मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचा इशारा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिला आहे. इंडियन मुजहिद्दीन दिल्ली व मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करण्याचे षडयंत्र आखत असल्याचे एनआयएने गृहमंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
या संघटनेच्या स्लिपर सेलने मुंबईतही अनेक भागांची रेकी केली असल्याचे पत्रात म्हटले आहे.